अकोट–अकोला मेमो रेल्वेचा वेळ बदलल्याने प्रवाशांचा संताप
अकोला, 17 डिसेंबर (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील सकाळी अकोटवरून अकोल्याकडे येणाऱ्या मेमो रेल्वेचा वेळ अचानक बदलण्यात आल्याने प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच मेमो रेल्वे सुरू ठेवावी, अ
P


अकोला, 17 डिसेंबर (हिं.स.)।

अकोला जिल्ह्यातील सकाळी अकोटवरून अकोल्याकडे येणाऱ्या मेमो रेल्वेचा वेळ अचानक बदलण्यात आल्याने प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच मेमो रेल्वे सुरू ठेवावी, अशी ठाम मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

वेळ बदलल्यामुळे सामान्य प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना अकोला शहरात वेळेवर पोहोचणे कठीण झाले असून, याचा थेट परिणाम कामकाज आणि शिक्षणावर होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अनेक विद्यार्थी महाविद्यालये व शाळांमध्ये उशिरा पोहोचत असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील प्रवासी व विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्य सरचिटणीस (विधी विभाग) अ‍ॅड. नंदकिशोर शेळके यांच्या नेतृत्वाखाली अकोला रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वरील स्टेशन मास्टरांना निवेदन सादर केले.

निवेदनात मेमो रेल्वे गाडी पूर्वीच्या वेळेप्रमाणेच सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर तात्काळ निर्णय घेऊन रेल्वेचा जुना वेळ पुन्हा लागू करण्यात आला नाही, तर यापेक्षाही मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande