नाशकात शुक्रवारी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)। - महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया दिनांक 19 डिसेंबर रोजी काँग्रेस भवन येथे होणार आहे अशी माहिती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे
नाशकात शुक्रवारी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती


नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)।

- महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया दिनांक 19 डिसेंबर रोजी काँग्रेस भवन येथे होणार आहे अशी माहिती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड व समन्वयक उल्हास सातभाई यांनी दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून सगळ्या प्रभागांमधून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अनेक अर्ज उमेदवारी करता दाखल करण्यात आलेले आहे या सर्वांच्या मुलाखती दिनांक 19 रोजी सकाळी 9 वाजेपासून काँग्रेस भवन येथे घेण्यात येणार आहे. या मुलाखतींच्या दरम्यान खासदार शोभाताई बच्छाव, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, उपाध्यक्ष शरद आहेर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, गटनेते शाहू खैरे, प्रदेश सचिव राहुल दिवे, माजी गटनेते राजेंद्र बागुल, माजी सभागृह नेते सुभाष देवरे, तसेच सर्व फ्रंटल आघाडी, विभाग, सेलचे प्रमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती निवड समितीचे समन्वयक उल्हास सातभाई, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व माहिती समवेत सकाळी 9 वाजता काँग्रेस कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन शहराध्यक्ष आकाश छाजेड व समन्वयक उल्हास सातभाई यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande