
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंचोना येथील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी २० गुंठ्यांवर परसबाग फुलवली. यात लावलेल्या भाजा पाल्यापासून विद्यार्थी शाळेला दिवसाकाठी १५०० रुपयांची कमाई करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा सेंद्रिय भाजीपाला बाजार हा “शिकत-शिकत कमवा” या संकल्पनेचा उत्तम नमुना ठरला असून इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता होत आहे.
६० शिक्षकांकडून भाजीपाला खरेदी ^शिक्षण परिषदेला उपस्थित असलेल्या ६० शिक्षकांनी या बाजारातून खरेदी केली. कमी दरात भाजीपाला व फळे उपलब्ध करून दिल्यानंतरही या उपक्रमातून शाळेला सुमारे १२०० ते १५०० रुपये उत्पन्न प्राप्त झाले.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षण देणारा तसेच सेंद्रिय शेतीबाबत जागृती निर्माण करणारा ठरला. सुभाष वानखडे, मुख्याध्यापक, चिंचोना. सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा लक्षवेधी प्रयोग शिक्षण परिषदेसाठी आलेल्या शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे व कौशल्याचे विशेष कौतुक केले.विद्यार्थ्यांच् या सहभागातून भरवलेला हा सेंद्रिय भाजीपाला बाजार हा केवळ विक्रीपुरता मर्यादित न राहता “शिकत-शिकत कमवा” या संकल्पनेचा उत्तम नमुना ठरला असून इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी