जळगाव - बोगस मतदान करणाऱ्याला पकडले
जळगाव, 2 डिसेंबर (हिं.स.)जामनेर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मंगळवारी (२ डिसेंबर) प्रभाग क्रमांक १० मध्ये बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणासह एका मुलीला मतदान केंद्रात
जळगाव - बोगस मतदान करणाऱ्याला पकडले


जळगाव, 2 डिसेंबर (हिं.स.)जामनेर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मंगळवारी (२ डिसेंबर) प्रभाग क्रमांक १० मध्ये बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणासह एका मुलीला मतदान केंद्रात बनावट ओळखपत्राचा वापर करून मतदानाचा प्रयत्न करताना पकडले. दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रोशन विनोद चौधरी (रा. पहूर कसबे) हा तरुण दुसऱ्याच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीचे उमेदवार आकाश उर्फ पवन बंडे यांनी त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला तात्काळ पोलिसांकडे सोपवण्यात आले. याचदरम्यान एका मुलीनेही दुसऱ्या मुलीच्या नावाने तयार केलेल्या बनावट आधारकार्डच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न केला. तिलादेखील कार्यकर्त्यांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी दुपारी दोन वाजता जामनेर पोलिसांना निवेदन देऊन बोगस मतदान करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चाळीसगावमध्येही माजी खासदार उन्मेश पाटील यांनी अशाच प्रकारांची माहिती समोर मांडल्याने जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande