आसाममध्ये भारताचे पहिले नेचर-थीम विमानतळ टर्मिनल
गुवाहाटी, 20 डिसेंबर (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी असममध्ये सुमारे 15,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात
गुवाहटी येथील नेचर-थीम विमानतळ टर्मिनल


गुवाहाटी, 20 डिसेंबर (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी असममध्ये सुमारे 15,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. हा भारतातील पहिला निसर्ग-थीमवर आधारित विमानतळ टर्मिनल असून, ‘बॅम्बू ऑर्किड्स’ या संकल्पनेतून असमच्या जैवविविधता आणि सांस्कृतिक वारशापासून प्रेरणा घेण्यात आली आहे. सुमारे 4 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या टर्मिनलची वार्षिक क्षमता 13.1 दशलक्ष प्रवाशांची आहे.

आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी गुवाहाटीतील या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी राज्यातील सुमारे 15,600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे अनावरण केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्वीटर (एक्स) पोस्टमध्ये म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, असममधील लोक भारताच्या पहिल्या निसर्ग-थीम असलेल्या विमानतळ टर्मिनलच्या उद्घाटनासाठी आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या नेतृत्वामुळे आणि असमला एक प्रमुख विकास इंजिन म्हणून पुढे नेण्याच्या आपल्या बांधिलकीमुळेच हे शक्य झाले आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या नव्या निसर्ग-थीम टर्मिनलची झलक शेअर करत सांगितले होते की, हे टर्मिनल असमच्या पायाभूत सुविधांसाठी मोठा टप्पा ठरेल.

बांबूू ऑर्किड्स टर्मिनलची वैशिष्ट्ये

गुवाहाटी विमानतळावरील ‘बॅम्बू ऑर्किड्स’ टर्मिनल-2 चे डिझाइन कोपौ फूल (फॉक्सटेल ऑर्किड) आणि स्थानिक बांबूपासून प्रेरित आहे. या अनोख्या टर्मिनलचे सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ‘अ‍ॅडव्हांटेज असम 2.0’ दरम्यान केले होते.

हे नवे टर्मिनल दरवर्षी 13.1 दशलक्ष प्रवाशांची हाताळणी करण्यास सक्षम असून, ईशान्य भारतातील आठही राज्यांमध्ये आर्थिक एकात्मता आणि समावेशक विकासाला चालना देण्यास मदत करेल. सुमारे 1.4 लाख चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या टर्मिनलच्या उभारणीसाठी 4,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये धावपट्टी, एअरफिल्ड प्रणाली, एप्रन आणि टॅक्सीवे यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत.

‘बॅम्बू ऑर्किड्स’ या थीमअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या टर्मिनलच्या डिझाइनमध्ये असमची जैवविविधता आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यात आला आहे. टर्मिनलमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध सुमारे 140 मेट्रिक टन ईशान्य भारतातील बांबूचा वापर करण्यात आला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानापासून प्रेरित हिरवेगार लँडस्केप, जपी मोटिफ, प्रतिष्ठित गेंड्याचे प्रतीक आणि कोपौ फुलांचे दर्शन घडवणारे 57 ऑर्किड-प्रेरित खांब यांचा समावेश आहे.याशिवाय, स्थानिक प्रजातींच्या सुमारे एक लाख वनस्पती असलेले एक अनोखे ‘स्काय फॉरेस्ट’ तयार करण्यात आले असून, येणाऱ्या प्रवाशांना जंगलासारखा अनुभव देण्याचा उद्देश आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande