परभणी : जिंतूर नगरपरिषदेत फुलले कमळ; प्रताप देशमुख नगराध्यक्षपदी
परभणी, 21 डिसेंबर (हिं.स.)। जिंतूर येथे संपन्न झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे प्रताप देशमुख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे सबिया बेगम कफिल फारूखी यांचा ३ हजार १६७ मतांनी पराभव केला. निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंग
जिंतूर नगरपरिषदेत फुलले कमळ; प्रताप देशमुख नगराध्यक्षपदी


परभणी, 21 डिसेंबर (हिं.स.)।

जिंतूर येथे संपन्न झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे प्रताप देशमुख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे सबिया बेगम कफिल फारूखी यांचा ३ हजार १६७ मतांनी पराभव केला.

निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपचे प्रताप देशमुख यांना १३ हजार १२२ मते, राष्ट्रवादीच्या सबिया बेगम फारुखी यांना ९ हजार ९५५ मते, राष्ट्रीय काँग्रेसचे सलीम पैलवान यांना ६ हजार २९२ मते मिळाली. तर अपक्ष सचिन राठोड यांना ३५५ बहुजन समाज पार्टी घनसावत राजेंद्र यांना २८५, शिवसेनेचे राजेश वट्टमवार १४३ मते मिळाली. नगरसेवक पदाच्या २५ पैकी १६ भाजप, ५ राष्ट्रवादी, ४ जागा काँग्रेसला मिळाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande