ठाणे पालिका निवडणूक : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
ठाणे, 21 डिसेंबर (हिं.स.)। आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा प्रशासक सौरभ राव यांच्या सूचनेनुसार उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण
Thane


ठाणे, 21 डिसेंबर (हिं.स.)। आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा प्रशासक सौरभ राव यांच्या सूचनेनुसार उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्वतयारी आढावा बैठक आज महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे पार पडली.

या बैठकीस उपायुक्त मुख्यालय जी.जी. गोदेपुरे, सहायक आयुक्त निवडणुक बाळू पिचड यांच्यासह प्रभागसमितीनिहाय नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या निवडणुक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सत्वशीला शिंदे, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीचे सर्जेराव म्हस्के- पाटील, वागळे प्रभाग समितीच्या वृषाली पाटील, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या प्रज्ञा सावंत, उथळसर प्रभाग समितीच्या उर्मिला पाटील, कळवा प्रभागसमितीच्या अश्विनी पाटील, मुंब्रा प्रभागसमितीचे गोपीनाथ ठोंबरे व अविनाश कोष्टी, दिवा प्रभागसमितीचे सुनिल शिंदे, विरसिंग वसावे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत नामांकन, छाननी, निवडणूक चिन्ह वाटप, अपात्रता, कायदा आणि सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, खर्चाचे निरीक्षण, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे इत्यादी बाबींशी संबंधित ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरण करण्यात आले.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ही मुक्त, निष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपायुक्त उमेश बिरारी यांनी बैठकीत दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande