रत्नागिरी : 'प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताह जनजागृती कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताहांअंतर्गत जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व लाभार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत प्रतिनिधी व इच्छुकांनी या कार्यशाळेस मोठ्या सं
रत्नागिरी : 'प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताह जनजागृती कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन


रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताहांअंतर्गत जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व लाभार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत प्रतिनिधी व इच्छुकांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

भारत सरकारच्या निर्देशानुसार प्रशासन गाव की ओरअंतर्गत समिती स्तरावर नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व विविध योजनांचा लाभ नागरिकांना तसेच सेवा पुरविण्यासाठी येत्या २५ डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तालुकास्तरावर जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी कार्यालयामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये अनुसूचित जाती घटकासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण सहाय्य, आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व इतर कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून अर्ज प्रक्रिया, अटी-शर्ती व तक्रार निवारणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.मंगळवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी खेड तालुक्यासाठी ले. पद्मश्री एस. एम. अण्णासाहेब बेहरे इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, खेड, दापोलीसाठी दापोली सिनीअर अर्बन कॉलेज, दापोली आणि गुहागरसाठी व्ही.पी.एम. महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे सकाळी ११ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.तर २४ डिसेंबर रोजी चिपळूण तालुक्यासाठी डी.बी.जे. महाविद्यालय. चिपळूण आणि लांजा तालुक्यासाठी तुकाराम पुंडलिक शेट्ये क. महाविद्यालय, लांजा येथे सकाळी ११ वाजता तर राजापूर तालुक्यासाठी दुपारी २ वाजता गाडे दाते कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande