मनरेगा कायदा वाचवा, व्हीबी -जी-राम-जी कायदा मागे घेण्याची मागणी!
अकोला, 22 डिसेंबर (हिं.स.)। नरेंद्र मोदी पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा नाव बदलून नवीन व्हीबी जी राम जी मिशन या नावाने योजना जाहीर केली आहे त्यात पुढे १०० दिवस कामाचा हक्क काढून घेणार आहे म्हणुन आज भारती
P


अकोला, 22 डिसेंबर (हिं.स.)।

नरेंद्र मोदी पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा नाव बदलून नवीन व्हीबी जी राम जी मिशन या नावाने योजना जाहीर केली आहे त्यात पुढे १०० दिवस कामाचा हक्क काढून घेणार आहे म्हणुन आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षांनी आज २२ डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलन पुकारण्या आले होते त्याला प्रतिसाद म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले यासह निवेदनामध्ये 200 दिवस प्रति वर्ष व प्रतिदिन सातशे रुपये वेतन दिले पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे सदर आंदोलन हे इतर तालुक्यात सुद्धा झाले असून आंदोलन कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून आंदोलनात कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड मायावती बोरकर कॉ. ज्योती ताथोड, कॉ. सविता प्रधान, कॉ. प्रिया वरोटे, कॉ. राजकन्या बनसोड, कॉ. चंदा शिंदे, कॉ. पद्माबाई डोंगरे, कॉ. संतु अंभोरे, कॉ. कांचन घरडे मेघा बोदडे कल्पना जाधव मंगला सिरसाट मेहजबीन आशा लिंगोट, ईश्ववरी कळसकर अजय ठाकरे उपस्थित होते.

☭ *कॉ. नयन गायकवाड भाकप/आयटक कामगार संघटना उपाध्यक्ष अकोला, उपाध्यक्ष वाशीम, बुलढाणा, अकोला कामगार वकील संघ .*

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande