
नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)।
:- नाशिक येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले वाड्.मय पुरस्कारांची घोषणा संयोजकांतर्फे करण्यात आली आहे. यंदाच्या या पुरस्कारासाठी पुढील साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे:- लीना देगलूरकर-मुके स्वर (कल्याण), विक्रांत केसरकर-संगतीचो (पालघर), निखिल कोलते-मनातलं न्यायालय (ठाणे), सत्यवान मंडलिक-स्वातंत्र्याची ७५ वर्ष (सांगली), विलास डेहनकर-घालमेल (बुलढाणा), भारती देव-इच्छा (नाशिक), अविनाश आहेर-वास्तव (नाशिक), वामन राऊत-चिराखाणी (दिंडोरी), शैलेश पाटोळे-आठवणींच्या श्रावणसरी (नाशिक), राहुल भगत-तहान (अकोला), उज्वला वडनेरे-मंथन (नवापूर), यशवंत पवार-दृष्टिकोन (नंदुरबार), सविता पोतदार-सदू आणि स्वातंत्र्यदिन (नाशिक), व्यंकटराव काळे-शून्यातून प्रेसिडेंट (नाशिक), प्रशांत शेवाळे-माझा जीवनप्रवास (नाशिक), मुग्धा शेखर-कोलाज (गोवा), कविता शिंगणे-जन्माची शिदोरी (नाशिक), सुनील देशपांडे-मानसी संवाद (पुणे), भास्कर ब्रम्हनाथकर-आणीबाणीचे ते दिवस (परभणी), माधुरी चोरे-वटवृक्ष (नाशिक), स्मिता जोगळेकर-पुन्हा पुन्हा (नाशिक), ॲड.राजेश पवार-नऊ एक किमयागार (नाशिक), जयंत भारदे-तत्त्वमसी (अहिल्यानगर), पद्माकर देशपांडे-श्री दत्त महात्म्य कथामृत (नाशिक), सुभाष उमरकर-अंतर्मनाचे तरंग (सामनगाव). येत्या १८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV