
नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत काळ्या पैशांचा, मौल्यवान वस्तूंचा तसेच अन्य अवैध आर्थिक साधनांचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग अलर्ट मोडवर आला आहे. निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख रक्कम, दागदागिने, भेटवस्तू किंवा अन्य मौल्यवान वस्तूंचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
अशा स्वरूपाच्या कोणत्याही गैरप्रकारांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ आयकर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सअॅप व ई-मेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता कायम राखण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. येथे साधा संपर्क... टोल फ्री क्रमांक: १८००२३३०३५५ / ३५६ व्हॉट्सअॅप क्रमांक : ९४०३३९०९८० (फोटो /व्हिडिओ पाठविण्यासाठी) ई-मेल : nagpur. addidit.inv@ incometax. gov.in, nashik. addidit. inv @ incometax.gov.in
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV