जळगाव पुन्हा गारठणार , पारा ९ अंशावर
जळगाव , 22 डिसेंबर (हिं.स.) गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या तापमानात अचानक घसरण झाली असून पार ९ अंशावर आला आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या सप्ताहात जिल्हा परिस
जळगाव पुन्हा गारठणार , पारा ९ अंशावर


जळगाव , 22 डिसेंबर (हिं.स.) गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या तापमानात अचानक घसरण झाली असून पार ९ अंशावर आला आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या सप्ताहात जिल्हा परिसरात थंडीच्या लाटेने आपला प्रभाव दाखवल्यानंतर, काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला होता. जिल्ह्यात दिवसा २७ ते २९ अंशादरम्यान उन तर सायंकाळनंतर रात्रीचे कमाल तापमान तापमान १९ अंशांवरून थेट ९ ते ६ अंशावर ३१ अंशांवर गेले होते, त्यामुळे थंडीचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसापूर्वी जळगाव शहरात तापमानाचा पारा किमान १४ अंशावर होता. त्यात पुन्हा घसरण होवून तापमान ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे पुन्हा गारठा वाढला असून शीतलहर जाणवून येत आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. थंडीचा प्रभाव वाढत राहणार असून किमान आठवडाभर तरी राहील,दरम्यान, या काळात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पारा किमान ५ ते ७ अंशापर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गारठ्याचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande