नाशिक शहर क्षेत्रात तीन जानेवारीपर्यंत नायलॉन मांजावर मनाई
नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)। शहरात डिसेंबर व जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. पतंग उडविण्यासाठी वापरात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉनचा असल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे वन्य प्राणी, पक्षी व मानवी जीवितास धोका निर्माण होऊन त्यांचे ज
नाशिक शहर क्षेत्रात तीन जानेवारीपर्यंत नायलॉन मांजावर मनाई


नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)। शहरात डिसेंबर व जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. पतंग उडविण्यासाठी वापरात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉनचा असल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे वन्य प्राणी, पक्षी व मानवी जीवितास धोका निर्माण होऊन त्यांचे जखमी होण्याचे व प्राण गमाविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे परस्पर घर्षण होऊन विद्युत प्रवाह खंडित होणे व आग लागणे अशा घटनाही घडतात. यास प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७(१) (अ) अन्वये पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक यांनी ज्या मांजांना काचेची कोटिंग आहे, असा टोकदार व धारदार चायनिज मांजा याची निर्मिती, विक्री, साठा व वापर यावर प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.

कोणी व्यक्ती शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशा पद्धतीचा नायलॉन मांजा बाळगेल, वापर करेल, अशा व्यक्तीवरदेखील हा आदेश लागू राहील. हा आदेश दि. ३ जानेवारी २०२६ पर्यंत अमलात असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्यास संहिता २०२३ या कायद्याचे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande