


परभणी, 22 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने
परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न झाली.
परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद व आढावा बैठक आज समता परिषद, माळी गल्ली येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस पक्षाचे परभणी निरीक्षक मधुकर राजे आर्दड व आमदार राजेश विटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला प्रताप भैय्या देशमुख (महापौर शहरजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकतीने उतरणार असून निश्चित पणाने मोठ्या जागा येतील असा दावा यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या परभणी महानगरपालिकेच्या अंतर्गत मोठी संधी असून या निमित्ताने गट विसरून आपण एकत्र येण्याचा मानस देखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis