बीड : पाटोदा आगारात शैक्षणिक सहलीतून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल १७लाखाने वाढ
बीड, 22 डिसेंबर (हिं.स.)।राज्य परिवहन महामंडळाच्या पाटोदा आगारात दाखल झालेल्या नवीन दहा बसेस लांबपल्यासाठी सोयीच्या ठरत आहेत. विशेषतः शैक्षणिक सहलीसाठी या बसेसचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे. यंदा शाळांकडून राज्यपरिवहन महामंडळाच्या बसमधून सहलीच
बीड : पाटोदा आगारात शैक्षणिक सहलीतून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल १७लाखाने वाढ


बीड, 22 डिसेंबर (हिं.स.)।राज्य परिवहन महामंडळाच्या पाटोदा आगारात दाखल झालेल्या नवीन दहा बसेस लांबपल्यासाठी सोयीच्या ठरत आहेत. विशेषतः शैक्षणिक सहलीसाठी या बसेसचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे. यंदा शाळांकडून राज्यपरिवहन महामंडळाच्या बसमधून सहलीचा प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात आहे. याचा पाटोदा आगारास मोठा आर्थिक लाभ होत असून दरवर्षपिक्षा यंदा शैक्षणिक सहलीतून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल १७लाखाने वाढ झाली आहे.

पाटोदा आगारासाठी दहा बस पाटोदा आगारात दाखल झाल्या. सदरील बस ह्या अत्याधुनिक व आरामदायी असल्याने प्रवाशांसाठी बसमधील प्रवास हा सुखकर झाला आहे. या बसेसमधून १६ लाख ६६ हजार ४०० रुपये उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न केवळ सहलींच्या माध्यमातून मिळाले आहे. सहलींसाठी प्रति किलोमीटर ३२ रुपये दराने शुल्क आकारले जात आहे.

या नवीन बसेसमध्ये पुश-बँक सीट, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, आरामदायी आसनव्यवस्था आदी आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित झाला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये तसेच पालकांकडूनही एसटी बसलाच प्राधान्य दिले जात आहे.

----------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande