
पुणे, 22 डिसेंबर (हिं.स.)। पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे व प्रतिनिधी यांची आज सकाळी बारामती गेस्ट हाऊस येथे बैठक पार पडली होती. या वेळी अजित पवार यांनी अल्पसंख्याक, दलित व आंबेडकरी समुदायाच्या प्रश्नांवर केलेल्या कामाच्या अनुषंगाने त्यांचे आभार व्यक्त करत हा पाठिंबा देत असल्याचे डंबाळे यांनी सांगितले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील आगामी योजनांच्या अंमलबजावणीत अनेक समाजोपयोगी विषय मार्गी लावण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याने त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे डंबाळे यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule