प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे आवश्यक - अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे
पुणे, 22 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अचूक,पारदर्शक आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ईव्हीएमची हाताळणी,मॉक पोलची कार्यपद्धती,मतदान साहित्याचे व्यवस
प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे आवश्यक - अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे


पुणे, 22 डिसेंबर (हिं.स.)।

महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अचूक,पारदर्शक आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ईव्हीएमची हाताळणी,मॉक पोलची कार्यपद्धती,मतदान साहित्याचे व्यवस्थापन,मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच मतदानानंतरची कार्यवाही या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती असणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय निवडणूक प्रशिक्षण चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीन सत्रांमध्ये पार पडले. या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे बोलत होते.

या प्रशिक्षणास सह आयुक्त मनोज लोणकर,उप आयुक्त पंकज पाटील,विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह मुख्य प्रशिक्षक नरेंद्र बंड,रामेश्वर पवार,शिवाजी लाटे,संजीव आनंदकर,किशोर शिंदे,अमोल शिंदे,गणेश सुर्वे तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande