महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 126 तुकडीचा दीक्षांत समारंभ
नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभर खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 126 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ बुधवार, 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथील मुख्य कवायत म
महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 126 तुकडीचा दीक्षांत समारंभ


नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभर खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 126 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ बुधवार, 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथील मुख्य कवायत मैदान येथे होणार आहे, असे प्रबोधीनीचे उपसंचालक (प्रशासन) संजय बारकुंड यांनी कळविले आहे.

पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 126 चे प्रशिक्षण 23 डिसेंबर 2024 पासुन सुरू झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवड झालेले 322 पुरूष व 67 महिला असे एकूण 389 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. या प्रशिक्षणार्थींपैकी 82 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर, 18 टक्के पदव्युतर आहेत. वर्षभराच्या कालावधीत या प्रशिक्षणार्थींना आंतरवर्गात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र तसे बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारिरीक प्रशिक्षण, गोळीबार सराव, योग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या दीक्षांत समारंभ कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलाणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ते प्रशिक्षणार्थींकडून मानवंदना स्वीकारतील. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक नवल बजाज हे सर्व प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. हा कार्यक्रम यु ट्यूब लाईव्ह वर देखील प्रसारीत केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande