
नवी दिल्ली, 22 डिसेंबर (हिं.स.) । बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करत विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याचा आरोप केला आहे. तसेच विहिंप 23 आणि 24 डिसेंबर रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात निषेध आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी बांगलादेश सरकारकडे हिंसाचाराबाबत स्पष्टीकरण मागितले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सोमवारी बांगलादेशातील अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराचा निषेध केला आणि सांगितले की अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत.विहिंपचे म्हणणे आहे की भारताच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सलोखा या तत्त्वांना आव्हान देणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना योग्य उत्तर दिले गेले पाहिजे. याच उद्देशाने विहिंप 23 आणि 24 डिसेंबर रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे.
ते म्हणाले की, “मला काही अहवाल पाहायला मिळाले, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की तरुण हिंदू दीपु चंद्र दास यांनी फक्त इतकेच म्हटले होते की सर्व धर्म समान आहेत. जर यालाच ईशनिंदा मानले जात असेल, तर ते भारताच्या धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सलोखा या तत्त्वांसाठी मोठे आव्हान आहे. नंतर एक निवेदन जारी करून स्पष्ट करण्यात आले की दीपु यांनी कोणतेही ईशनिंदात्मक विधान केले नव्हते. जर तसेच असेल, तर त्यांची हत्या का करण्यात आली ? याचे उत्तर बांगलादेशला द्यावे लागेल. बांगलादेशातील शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येबाबत विहिंपच्या कार्यकारी अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला की मुख्य सल्लागार युनूस यांना याबाबत सहमती आहे काय. तसेच हादी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर युनूस यांनी ईशान्य भारताचा समावेश असलेला ‘बृहत्तर बांगलादेश’चा नकाशा दाखवला, असेही त्यांनी नमूद केले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके