शेतकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अल्कालाईन पाण्याचे महत्त्व
रायगड, 22 डिसेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अल्कालाईन पाण्याचा वापर अत्यंत उपयुक्त असून तो दैनंदिन जीवनात स्वीकारावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ, अमरावतीचे राष्ट्रीय संचालक तथा रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाट
शेतकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अल्कालाईन पाण्याचे महत्त्व


रायगड, 22 डिसेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अल्कालाईन पाण्याचा वापर अत्यंत उपयुक्त असून तो दैनंदिन जीवनात स्वीकारावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ, अमरावतीचे राष्ट्रीय संचालक तथा रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले. डेस्टिनीशन फॉरेस्ट अँग्रो टुरिझम सेंटर, सांबरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शेतामधील शेतघर, गोठा, नारळ व आंबा बागायत यांना लागणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही आपत्ती टाळण्यासाठी शेताच्या सभोवताली बांधापासून आतल्या बाजूस जेसीबीच्या सहाय्याने सुमारे पाच फूट खोल चर खणावा. त्या चरातून काढलेल्या मातीवर बहुगुणी शेवगा, नारळ व हापूस आंब्याची लागवड केल्यास आर्थिक उत्पन्न वाढते तसेच आगीचा धोका कमी होतो, असे मार्गदर्शन डॉ. पाटील यांनी केले.

यावेळी त्यांच्या हस्ते अल्कालाईन वॉटर संचाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांचा परिचय सागरगड शेतकरी संघाचे सचिव रोहित पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमास व्याख्याते प्रफुल्ल पाटील, संयुक्ती सनव्हिरो पुण्याचे मालक तुषार जगदाळे, कंत्राटदार जोशी, वायरमन नरेंद्र ठाकूर, विजय पाटील, सागरगड शेतकरी महासंघाचे खजिनदार मोहन विठ्ठल पाटील, सदाशिव म्हात्रे, उपाध्यक्ष शशिकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात आयोजक व प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील यांनी सांगितले की, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अल्प दरात निवास, चहा-नाश्ता, शाकाहारी व मांसाहारी भोजन, तसेच आरोग्यदायी अल्कालाईन पाणी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी करून शासनाच्या योजना, किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा, शेतावर गमबूटचा वापर करावा, सर्पदंश झाल्यास त्वरित १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधावा, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ११२ व १०२ क्रमांकांचा उपयोग करावा, असे आवर्जून सांगितले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी अशोक डावर, अनिकेत म्हात्रे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार राजा पाटील यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande