
चंद्रपूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।
किडनी विक्रीप्रकरणी पोलिसांना तपासात मोठे यश मिळाले आहे. ज्याच्या माध्यमातून रोशन कुळे या शेतकऱ्याने कंबोडियात किडनी विकली. तो कृष्णा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला सोमवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.
कृष्णा हे नाव धारण करून तो सोलापुरात वास्तव्यास होता. त्याला तिथून पकडण्यात आले आहे. फेसबूक पेजच्या माध्यमातून रोशन त्याच्या संपर्कात आला. व्हॉट्सॲप चॅट आणि फोनच्या माध्यमातून हे दोघे संपर्कात होते. त्यानेच रोशनला किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि मोबदल्यात आठ लाख मिळतील, असे सांगितले. रोशन कंबोडियाला जाण्यापूर्वी त्यांची पहिली भेट कोलकाता इथे झाल्याचे सांगितले जाते.
आरोपी कृष्णाने केली होती. या व्यवसायात तो अपयशी ठरल्याने कर्जात बुडाला होता. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कृष्णा याने कंबोडिया येथील रुग्णालयात आपली किडनी विकली होती. आतापर्यंत १० ते १२ लोकांना किडनी काढण्यासाठी कंबोडिया येथे नेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव