जळगावात भरदिवसा चोरी
जळगाव, 23 डिसेंबर (हिं.स.) | देवीच्या दर्शनासाठी रावेर तालुक्यातील वाघोदा येथे गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष रघुनाथ महाजन (वय ७२, रा. राधा रमण अपार्टमेंट, शिव कॉलनी) यांच्या बंद घरावर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारत रोख रक्कम व सोने-चांदीचे दाग
जळगावात भरदिवसा चोरी


जळगाव, 23 डिसेंबर (हिं.स.) | देवीच्या दर्शनासाठी रावेर तालुक्यातील वाघोदा येथे गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष रघुनाथ महाजन (वय ७२, रा. राधा रमण अपार्टमेंट, शिव कॉलनी) यांच्या बंद घरावर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारत रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिव कॉलनी येथील राधा रमण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये सुभाष महाजन हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ते आपल्या मूळ गाव वाघोदा (ता. रावेर) येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप गायब असल्याचे आढळून आले. संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, हॉलमधील कॉटवर लोखंडी कपाटातील चिल्लरचा डबा पडलेला दिसून आला.

यामुळे घरात चोरी झाल्याची खात्री झाली. लॉकर तोडून दागिन्यांची चोरी त्यानंतर महाजन कुटुंबियांनी घरातील इतर खोल्यांची पाहणी केली असता, लोखंडी कपाट उघडे असून त्यातील लॉकर तोडण्यात आल्याचे आढळले. लॉकरमध्ये ठेवलेले लग्नातील सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज

चोरट्यांनी घरातून चार हजार रुपयांची रोख रक्कम, २४ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ३६ हजार रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले, दीड हजार रुपये किमतीची चांदीची साखळी, दीड हजार रुपयांच्या चांदीच्या अंगठ्या तसेच एक हजार रुपये किमतीचे चांदीचे करधोडे असा एकूण १ लाख ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande