आजही चिखलदरामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो - यशोमती ठाकूर
अमरावती, 23 डिसेंबर (हिं.स.)अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषद मध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं, 20 पैकी 12 जागा काँग्रेस पक्षाच्या विजयी झाल्या, आणि काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर नगराध्यक्षपदी विजयी झाले, त्यानंतर आज अमरावती मध्ये काँग्रेस नेत्य
आजही चिखलदरामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो  - काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर....


अमरावती, 23 डिसेंबर (हिं.स.)अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषद मध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं, 20 पैकी 12 जागा काँग्रेस पक्षाच्या विजयी झाल्या, आणि काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर नगराध्यक्षपदी विजयी झाले, त्यानंतर आज अमरावती मध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष सह नगरसेवकांचा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांचा सत्कार करत त्यांच स्वागत केल, त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.आजही चिखलदरामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे भाजपने ओढाओढीच राजकारण थांबवायला पाहिजे, भाजपने विकासाच्या राजकारणाला साथ दिली पाहिजे आमच्या लोकांना बदनाम करणे बंद करा, जनतेने काँग्रेसला कौल दिलेला आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande