गडचिरोली : हरभरा क्षेत्रवाढीसाठी प्रमाणित बियाणे वितरण सुरू
गडचिरोली, 23 डिसेंबर (हिं.स.) | राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हरभरा पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे प्रमाणित बियाणे मोठ्या सवलतीत उपलब्ध करून दिले जा
गडचिरोली : हरभरा क्षेत्रवाढीसाठी प्रमाणित बियाणे वितरण सुरू


गडचिरोली, 23 डिसेंबर (हिं.स.) | राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हरभरा पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे प्रमाणित बियाणे मोठ्या सवलतीत उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्याकडे या बियाणे पुरवठ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील वाणाच्या वयोमानानुसार आर्थिक लाभ दिला जात आहे.

ज्यामध्ये १० वर्षांच्या आतील हरभरा वाणांसाठी ५००० रुपये प्रति क्विंटल किंवा किमतीच्या ५० टक्के सवलत दिली जात आहे. तसेच १० वर्षांवरील वाणांसाठी २५०० रुपये प्रति क्विंटल किंवा ५० टक्के या दराने अनुदान उपलब्ध आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला किमान ०.२० ते १ हेक्टरच्या मर्यादेत या बियाण्यांचा लाभ घेता येईल.हे बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला ७/१२ उतारा, ८-अ उतारा आणि फार्मर आयडी ही कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील कोरची येथील पूजा कृषी सेवा केंद्र, आरमोरी येथील वनमाळी कृषी सेवा केंद्र, कुरखेडा येथील तालुका खरेदी विक्री संघ आणि वडसा येथील शेतकरी कृषी सेवा केंद्र या ठिकाणी हे बियाणे वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.कडधान्य उत्पादनात जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा अधिकृत महाबीज विक्रेत्यांशी संपर्क साधून बियाणे उचल करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande