अकोला : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूकीच्या मुलाखती
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अकोला महानगरतर्फे इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखती अकोला महानगर जिल्हा निरीक्षक गणेश राय यांच्या
H


अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अकोला महानगरतर्फे इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखती अकोला महानगर जिल्हा निरीक्षक गणेश राय यांच्यासह पक्षाचे प्रमुख प्रदेश पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडल्या.

रामदासपेठ येथील अब्दुल कलाम आझाद हॉलमध्ये या थेट मुलाखती घेण्यात आल्या. महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह उपस्थिती लावत प्रचंड उत्साह दाखवला.

या वेळी महानगरातील माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, विविध फ्रंटल सेलचे अध्यक्ष, महिला आघाडी, युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्याचा, जनसंपर्काचा आणि संघटनात्मक अनुभवाचा सविस्तर आढावा घेतला.

आज झालेल्या या मुलाखतींमध्ये उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येक उमेदवाराकडून पक्षाकडे आशेने व विश्वासाने उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मुलाखतीदरम्यान उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह आणि चैतन्य दिसून आले.

या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गवांडे, शामबाबू अवस्थी, प्रदेश सचिव प्रा. विश्वनाथ कांबळे, प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया, महानगराध्यक्ष मो. रफिक सिद्धीकी, कार्याध्यक्ष देवाभाऊ ताले, कार्याध्यक्ष सैयद युसुफ अली, उपाध्यक्ष पापाचंद पवार, माजी नगरसेवक शेख अझीज, प्रदेश महिला उपाध्यक्ष शेख रिजवान अख्तर बाजी तसेच जमील अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ नेता व प्रदेश उपाध्यक्ष संतोष दादा कोरपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही मुलाखत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, सक्षम, जनाधार असलेले आणि पक्षाशी निष्ठावान उमेदवार निवडण्यावर भर दिला जाणार असल्याचे पक्ष नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले.

ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अकोला महानगर अध्यक्ष मो. रफिक सिद्धीकी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला महानगर संघटना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande