जागतिक कौशल्य स्पर्धेची विभागीय फेरी बुधवारी अमरावतीत
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। २३ वर्षाखालील उमेदवारांकरीता जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि उत्कृष्टता कौशल्य स्पर्धा आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते. यावेळी सप्टेंबर २०२६ मध्ये शांघाई चीन येथे जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेची प्राथमिक पात्रता चाचणी ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली असून पात्र उमेदवारांचा स्पर्धेमध्ये सहभाग निश्चित करण्याचे अनुषंगाने विभागीय पात्रता फेरीचे आयोजन डॉ. श्रीकांत जिचकर सभागृह, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे दि. २४ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आले आहे.

करीता जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी पात्रता फेरी उत्तीर्ण केली आहे अशा उमेदवारांनी दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वा श्रीकांत जिचकर सभागृह, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे उपस्थित राहावे असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे

 rajesh pande