रायगड : नकाशा बदलून घर विक्रीत फ्लॅट खरेदीदाराची फसवणूक
रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत मौजे रिस कांबे, ता. खालापूर येथील हेरंब गुरूकृपा कॉम्प्लेक्स या गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट खरेदीदाराची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्य
घराच्या स्वप्नाला न्यायालयीन वळण;  नकाशा बदलून घर विक्री


रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत मौजे रिस कांबे, ता. खालापूर येथील हेरंब गुरूकृपा कॉम्प्लेक्स या गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट खरेदीदाराची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, दुय्यम निबंधक कार्यालय, खालापूर येथे ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आरोपी क्रमांक १ ते ४ हे सर्वजण धवलगिरी कॉम्प्लेक्स, ठाणा नाका, ता. पनवेल येथील रहिवासी असून, त्यांनी हेरंब गुरूकृपा कॉम्प्लेक्स हा प्रकल्प नगररचनाकार, अलिबाग यांच्याकडून मंजूर करून घेतला होता. मात्र मंजूर नकाशानुसार बांधकाम न करता, परस्पर नकाशामध्ये बदल करून नियमबाह्य बांधकाम केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपींनी श्री. गजानन एंटरप्रायजेस या नावाने जाहिरात ब्रॉशर प्रसिद्ध करून हेरंब गुरूकृपा कॉम्प्लेक्स 1 & 2 BHK Luxury Flats अशी जाहिरात केली. प्रत्यक्षात फ्लॅट क्रमांक D-101 हा 1 RK (वन रूम किचन) म्हणून मंजूर असताना, त्यामध्ये बेकायदेशीररित्या 1 BHK (हॉल, बेडरूम, किचन) असे बांधकाम करण्यात आले.

तसेच सदर फ्लॅटचे खरेदीखत करताना मंजूर नकाशा न जोडता बदल केलेला नकाशा जोडण्यात आला. प्रत्यक्ष कार्पेट एरिया 374.37 चौरस फूट असताना, खरेदीखतात 414 चौरस फूट कार्पेट एरिया असल्याचे नमूद करून फिर्यादी (रा. रूम नं. 201, भूमिका पॅलेस, सेक्टर 10, नवीन पनवेल) यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 245/2025 अन्वये भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 470, 471, 472 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास म.पो.उपनिरीक्षक श्रीमती अनुसया ढोणे या करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande