गडचिरोली - रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर
गडचिरोली, 23 डिसेंबर (हिं.स.) | राज्यात शेती उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागातर्फे दरवर्षी राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्याच अनुषंगान
गडचिरोली - रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर


गडचिरोली, 23 डिसेंबर (हिं.स.) | राज्यात शेती उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागातर्फे दरवर्षी राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्याच अनुषंगाने रब्बी हंगाम २०२५-२६ साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेमुळे प्रयोगशील शेतकऱ्यांचे मनोबल वाढून अद्ययावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होईल, तसेच त्यांच्या यशस्वी अनुभवांचा लाभ परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळून राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडेल, असा या योजनेचा उद्देश आहे.

या स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांना तालुकास्तरावरील पीक स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार असून, तालुक्यातील उत्पादकतेच्या आधारे जिल्हा व राज्यस्तरासाठी विजेत्यांची निवड केली जाणार आहे. रब्बी हंगामातील एकूण पाच पिकांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असून, तालुका, जिल्हा व राज्य अशा तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.

स्पर्धेत समाविष्ट रब्बी पिकेज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण ०५ पिके)

प्रवेश शुल्कसर्वसाधारण गट : प्रतिपिक ३०० रुपयेआदिवासी गट : प्रतिपिक १५० रुपये

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५

बक्षिसांचे स्वरूप (सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी समान)तालुकास्तर : प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये, तृतीय २,००० रुपयेजिल्हास्तर : प्रथम १०,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये, तृतीय ५,००० रुपयेराज्यस्तर : प्रथम ५०,००० रुपये, द्वितीय ४०,००० रुपये, तृतीय ३०,००० रुपये शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून त्यांच्या कष्टातून पिकवलेल्या उच्चांकी उत्पादनाला योग्य सन्मान देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असल्याचे नमूद करत, रब्बी हंगाम २०२५-२६ साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या राज्यांतर्गत पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande