शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे २६ डिसेंबर रोजी प्रस्थान
जळगाव, 23 डिसेंबर (हिं.स.) शेंदुर्णी ता. जामनेर येथील संत श्री गजानन महाराज भक्त परिवार शेंदुर्णी यांचे वतीने दि. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे आयोजन करण्यात आले असुन यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. २६ डिसेंबर शुक्
शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे २६ डिसेंबर रोजी प्रस्थान


जळगाव, 23 डिसेंबर (हिं.स.) शेंदुर्णी ता. जामनेर येथील संत श्री गजानन महाराज भक्त परिवार शेंदुर्णी यांचे वतीने दि. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे आयोजन करण्यात आले असुन यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. २६ डिसेंबर शुक्रवार नियोजित संत श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात रोजी सकाळी ८ वाजता आरती झाल्यावर वारीचे प्रस्थान होणार आहे. शेंदुर्णी, वाकोद, चिंचखेडा तवा, वाकडी, फत्तेपुर, तोरनाळा, देऊळगाव गुजरी, धामणगाव बढे, थळ, राहिणखेड, वाघजळ फाटा, कोथळी, जयपुर, भंडारी, पिंपळगाव राजा, भडंग, घाटपुरी, खामगाव, अन्नकुडी आदी गावातुन ही पायी वारी जाणार असुन ३१ डिसेंबर बुधवारी शेगांव येथे पोहचणार आहे. एकुण १४६ किलोमीटर चा प्रवास करत ६ व्या दिवशी पायी वारी शेगांव येथे पोहचणार आहे. या वारीत जागोजागी संत श्री गजानन महाराज भक्त मंडळी यांचे कडुन चहा नास्ता, दुपारचे व संध्याकाळी जेवण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेंदुर्णी येथे भव्य श्री. संत गजानन महाराज यांच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर असुन या मंदिरात दर गुरुवारी तसेच एकादशीला भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात बावन्नी होत असते. तरी भाविकांनी या पायी वारीत सहभागी व्हावे असे आवाहन संत श्री गजानन महाराज भक्त परिवार शेंदुर्णी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande