
बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)।बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली.
न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम वाचून दाखवला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. यादरम्यान न्यायधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना एक प्रश्न विचारला. यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23 वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणीच्या सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. संपूर्ण घटनाक्रम आरोपीला वाचून दाखवत हे तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल विचारला. न्यायाधिशांच्या या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले. यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वत:हून आरोप मान्य नसल्याचं बोलला. आता सदर प्रकरणी 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis