गडचिरोली: सीसीआय केंद्रावर कापूस विक्री करण्याचे आवाहन
गडचिरोली., 23 डिसेंबर (हिं.स.) शासनाने भारतीय कपास निगम अंतर्गत कापूस विक्रीकरिता शासनाचे ''कपास किसान'' ॲपवर नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. गडचिरोली जिल्ह्यात अंदाजे सहा हजार कापूस उत्पादक शेतकरी असून लाखो क्विंटल कापूस उत्पादित झाले
संचालक अतुल गण्यारपवार


गडचिरोली., 23 डिसेंबर (हिं.स.)

शासनाने भारतीय कपास निगम अंतर्गत कापूस विक्रीकरिता शासनाचे 'कपास किसान' ॲपवर नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. गडचिरोली जिल्ह्यात अंदाजे सहा हजार कापूस उत्पादक शेतकरी असून लाखो क्विंटल कापूस उत्पादित झालेला आहे. त्यापैकी १७०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १२१८ शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रासह कपास किसान ॲपवर डाउनलोड केले असल्याने त्यांचे अलॉटमेंट झाले आहे. व ५१६ शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रे कपास किसान ॲपवर डाउनलोड न केल्यामुळे त्यांचे अलॉटमेंट झाले नाही. व ५७२ शेतकऱ्यांनी शासनाच्या कापूस आधारभूत केंद्रावर कापूस विक्री केली आहे. व अंदाजे चार हजार शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत कापूस विक्री केंद्रावर कापूस विक्रीची नोंद केलेली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे वैयक्तिक लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात बाहेरील कापूस खरेदीदार व्यापारी अंदाजे ६५०० ते ७००० च्या भावाने कापूस खरेदी करतात, तर शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर कापूस विक्रीचे दर मध्यम धागा ७७१० रुपये व लांब धागा ८११० रुपये प्रति क्विंटल भाव आहे.

शेतकऱ्यांना शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर वाहतूक करण्याकरिता अंदाजे एका ट्रक गाडीचा आठ ते दहा हजार खर्च येत असला, तरी एका ट्रकगाडीत अंदाजे ७० ते ८० क्विंटल कापूस येतो; म्हणजेच अंदाजे ८० हजार रुपयांचा नफा मिळतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली नाही, त्यांनी संपूर्ण कागदपत्रासह शासनाच्या कपास किसान ॲपवर सर्व कागदपत्रे डाउनलोड करून कापूस विक्रीची नोंदणी करावी. शासनाची कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ असल्याने सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

कापूस विक्रीकरिता कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरून नोंदणी करायची आहे. ज्या शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास अडचण निर्माण होत असेल त्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथील कर्मचाऱ्यांशी संपर्क करून आपली नोंदणी करून घ्यावी.

गडचिरोली जिल्ह्यात शासनाचे CCI कापूस हमीभाव खरेदी केंद्र चामोर्शी तालुक्यातील मे. आस्था जिनिंग अँड प्रेसिंग, अनखोडा व मे. प्रिन्स कॉटन जिनिंग, अनखोडा येथे आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस शासनाच्या हमीभाव केंद्रामध्येच विक्री करावा. खासगीमध्ये कापूस विक्री केल्यास फार मोठे नुकसान होत असल्याने सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रामध्येच कापूस विक्री करावा, असे आवाहन अतुलभाऊ गण्यारपवार, संचालक, महा.रा. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई तथा माजी कृषि सभापती, जि.प. गडचिरोली यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande