जगन्नाथ पुरी येथे श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचे आयोजन
परभणी, 23 डिसेंबर (हिं.स.)। सेलू, परभणीसह मराठवाडा, विदर्भातील भाविकांच्या वतीने ओडिशा राज्यातील पवित्र श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे श्रीमद्भागवत महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परम पूज्य श्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच
श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या वाणीतून श्रीमद्भागवत महापुराण कथा  २६ डिसेंबरपासून ओडिशामध्ये भक्तीचा सोहळा; कलश यात्रेने होणार प्रारंभ परभणीसह मराठवाडा, विदर्भातील भाविकांच्या वतीने


परभणी, 23 डिसेंबर (हिं.स.)। सेलू, परभणीसह मराठवाडा, विदर्भातील भाविकांच्या वतीने ओडिशा राज्यातील पवित्र श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे श्रीमद्भागवत महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परम पूज्य श्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून ही कथा भाविकांना ऐकता येणार आहे. हा आध्यात्मिक सोहळा शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ ते गुरुवार, १ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून सेलू, परभणीसह मराठवाडा, विदर्भ आणि राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होत आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार २६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता भव्य कलश यात्रेने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कथेस प्रारंभ होईल. शनिवार, २७ डिसेंबर ते बुधवार, ३१ डिसेंबर या दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. यामध्ये सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत पूजा अर्चा, सकाळी ८ ते ९ नाश्ता आणि सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मुख्य कथा प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते ३ भोजन प्रसाद, सायंकाळी ६ ते ८ विविध सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम आणि रात्री ८ ते ९ भोजन प्रसादाचा भाविकांना घेता येईल.

या सोहळ्याची सांगता गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. समारोपाच्या दिवशी सकाळी ६ ते ७ पूजा अर्चा, ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत कथा व समापन सोहळा पार पडेल. दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथील हॉटेल सेवन हील्स, प्लॉट नंबर ३५१, सिपासरूबली मौजा, बलियापांडा, येथे आयोजित या मंगलमयी वातावरणात होणाऱ्या भागवत कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande