एअरपोर्टमुळे नवी मुंबईच्या प्रॉपर्टी मार्केटला नवी झेप
नवी मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी पहिली व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू होताच नवी मुंबई आणि परिसरात विकासाला नवी गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा उत्साह निर्माण झाला असून डेव्ह
ai creat photo


नवी मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी पहिली व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू होताच नवी मुंबई आणि परिसरात विकासाला नवी गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा उत्साह निर्माण झाला असून डेव्हलपर्स, गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांचे लक्ष वेगाने नवी मुंबईकडे वळत आहे. विमानतळ सुरू झाल्याने अटल सेतू, अलिबाग–विरार मल्टीमोडल कॉरिडॉर, मुंबई–नवी मुंबई मेट्रो आणि मुंबई–पुणे एक्सप्रेसवे यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही एकाच वेळी गती मिळाली आहे. याचा थेट परिणाम निवासी तसेच लक्झरी हाउसिंगच्या मागणीवर होताना दिसून येत आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ महिन्यांत नवी मुंबई आणि आजूबाजूच्या प्रमुख मायक्रो-मार्केट्समध्ये घरांच्या किमतींमध्ये १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. उलवे परिसरात सर्वाधिक ३० ते ३५ टक्के दरवाढ झाली असून पनवेलमध्ये २५ ते ३० टक्के, खारघरमध्ये २० ते २५ टक्के आणि तलोजामध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. खोपोलीमध्ये १८ ते २२ टक्के , कर्जतमध्ये १५ ते २० टक्के आणि अलिबागमध्ये २० ते २५ टक्के अशी या भागांमध्येही लक्षणीय दरवाढ दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, विमानतळालगतचे भाग सर्वाधिक फायदेशीर ठरत असून ४५ मिनिटांच्या कनेक्टिव्हिटी रेंजमध्ये येणारे परिसर गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक बनले आहेत.

वर्क-फ्रॉम-होम आणि हायब्रिड वर्क कल्चरमुळे नवी मुंबईसह कर्जत, खोपोली आणि अलिबागसारख्या भागांमध्ये सेकंड होम्स आणि वीकेंड होम्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर क्रेडाईकडून नवी मुंबईत विशेष प्रॉपर्टी शोचे आयोजन करण्यात आले असून अनेक नामांकित डेव्हलपर्स या भागात लक्झरी आणि हाय-एंड निवासी प्रकल्प सादर करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, NeoLiv चे Founder आणि सीईओ मोहित मल्होत्रा यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, विमानतळ सुरू झाल्याने विस्तारित एमएमआर मध्ये प्रादेशिक विकासाचा नवा टप्पा सुरू झाला असून याचा फायदा केवळ विमानतळाजवळील भागांपुरता मर्यादित न राहता खोपोलीसारख्या रणनीतिकदृष्ट्या जोडलेल्या परिसरांनाही होणार आहे. एकूणच, विमानतळामुळे नवी मुंबईचा प्रॉपर्टी मार्केट नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande