
नवी दिल्ली, २४ डिसेंबर (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (२५ डिसेंबर) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करतील आणि एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत.
राष्ट्रीय प्रेरणा स्थळ हे स्वतंत्र भारतातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या वारशाचे सन्मान करण्यासाठी विकसित केलेले कायमस्वरूपी राष्ट्रीय स्मारक संकुल आहे. हे संकुल अंदाजे २३० कोटी खर्चून बांधण्यात आले आहे आणि ६५ एकर क्षेत्रात पसरलेले आहे.
या संकुलात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे ६५ फूट उंच कांस्य पुतळे आहेत. यामध्ये सुमारे ९८,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले अत्याधुनिक कमळाच्या आकाराचे संग्रहालय देखील आहे. हे संग्रहालय डिजिटल आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञानाद्वारे भारताचा राष्ट्रीय प्रवास आणि नेतृत्वाचा वारसा प्रदर्शित करते.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे