
अकोला, 26 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात दाखल मिसिंग प्रकरणातील २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत शोधून काढत सुखरूपपणे पोलीस ठाण्यात परत आणले आहे. शहरातील न्यू तापडीया नगर येथील ही तरुणी २३ डिसेंबर रोजी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात दाखल केली होती.तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अखेर संबंधित तरुणी सापडल्याने तिची सुखरूप सुटका करण्यात आली असून मिसिंगची तक्रार बंद करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील लाईन पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे