पाकिस्तानातील मदरशावर ड्रोन हल्ला, ९ मुले जखमी
इस्लामाबाद , 26 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील एका मदरशावर ड्रोनद्वारे हॉल करण्यात आला. या हल्ल्यात 9 मुले जखमी झाली आहेत. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. हा हल्ला खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका मदरशावर झाला. या ड्रोन हल्ल्यात जखमी झाल
पाकिस्तानातील मदरशावर ड्रोन हल्ला, ९ मुले जखमी


इस्लामाबाद , 26 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील एका मदरशावर ड्रोनद्वारे हॉल करण्यात आला. या हल्ल्यात 9 मुले जखमी झाली आहेत. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. हा हल्ला खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका मदरशावर झाला. या ड्रोन हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की गुरुवारी टँक जिल्ह्यातील शादिखेल गावात असलेल्या या धार्मिक मदरशाला त्या वेळी ड्रोनने लक्ष्य केले, जेव्हा मुले वर्गात उपस्थित होती. या मदरशावर नेमका कोणी हल्ला केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रेस्क्यू 1122 च्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना टँक येथील जिल्हा मुख्यालय (DHQ) रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की जखमींमध्ये तीन मुली आणि सहा मुलगे असून, सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ते धोक्याबाहेर आहेत.

पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हल्ल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी मौलवींना नेतृत्वाखाली टँक जिल्ह्याच्या मुख्य चौकात धरणे आंदोलन केले. मदरशावर हल्ला केल्याबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत या कृत्याला अमानुष ठरवले.या आंदोलनामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक अनेक तासांसाठी ठप्प झाली आणि बाजारपेठा बंद राहिल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधिकारी शब्बीर हुसेन हे आंदोलनस्थळी पोहोचले आणि मौलवींशी चर्चा केली. त्यानंतर डीपीओ हुसेन, अतिरिक्त उपायुक्त नैमतुल्लाह आणि सहाय्यक आयुक्त साजिद खान यांनीही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, ज्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे या घटनेची गंभीर दखल घेण्याची आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande