
अकोला, 27 डिसेंबर (हिं.स.)। विकास आणि सकारात्मक प्रचार च्या माध्यमातून अकोला महानगरपालिका मध्ये भगवा झेंडा फडकून राज राजेश्वर नगरीचा सन्मान वाढवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करेल यासाठी जनतेचा आशीर्वाद जनतेची साथ सेवा संकल्प घेऊन भारतीय जनता पक्षाची वाटचाल राहील याचे अभिवचन आम्ही देतो.. या शब्दात आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारांची संवाद साधला.
अकोला शहरातील अठरा प्रभागांमध्ये वेगवेगळ्या नागरिकांची वेगवेगळ्या छोट्याखाली सभा बैठका घेऊन आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे भारतीय जनता पक्ष महिला आघाडी तसेच विजय अग्रवाल जयंत मसने यांनी संवाद साधला आहे.
सेवा समर्पण विश्वास जनतेची सेवेकरी जनतेचे सेवक जनतेशी समर्पित कार्यकर्त्यांची टीम अकोलेकर आणि राज्य राजेश्वर मालकांना संवाद साधून भारतीय जनता पक्ष सातत्याने संवाद साधून आतापर्यंत 27 हजार 424, नागरिकाची संवाद साधला आहे.
ई बस सेवा हॉस्पिटल्स विमानतळ क्रीडा संकुल कार्यालय पोलिसांसाठी वसाहत शहरातील रस्ते तसेच अकोला शहराच्या नागरिकांना अपेक्षित कार्य भारतीय जनता पक्ष केले असून जनतेचा विश्वास हीच ताकद भारतीय जनता पक्षाची असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले, तर आमदार वसंत खंडेलवाल यांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांची संवाद साधला आहे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे