काँग्रेसचे रेणापूर कृउबा संचालक अशोक राठोड यांचा भाजपात प्रवेश
लातूर, 27 डिसेंबर, (हिं.स.)। रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काँग्रेस कार्यकर्ते अशोक रामराव राठोड यांनी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शनिवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. लातूर य
आ.रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत  काँग्रेसचे रेणापूर कृउबा संचालक अशोक राठोड यांचा भाजपात प्रवेश...!


लातूर, 27 डिसेंबर, (हिं.स.)। रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काँग्रेस कार्यकर्ते अशोक रामराव राठोड यांनी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शनिवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात शनिवारी सकाळी रेणापूर तालुक्यातील मौजे फरदपूर येथील बंजारा समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते रेणापूर बाजार समितीचे संचालक अशोक रामराव राठोड यांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, माजी सभापती अनिल भिसे, भाजपाचे मंडल अध्यक्ष शरद दरेकर, सुरज शिंदे, प्रताप पाटील, फरदपूरचे सरपंच बालाजी राठोड, गरसुळीचे सरपंच अजय राठोड, माजी सभापती विजय चव्हाण, प्रवीण कोतवाल, संजय ठाकूर, नारायण राठोड, गणेश चव्हाण, उत्तम चव्हाण, श्रीमंत नागरगोजे, सुभाष राठोड, प्रकाश राठोड, राजसंघ राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

रेणापूर तालुक्यासह संपूर्ण लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गावागावात वाडी वस्तीत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून विकास कामांना गती दिली. सर्वत्र होत असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन मतदार संघातील अनेकजण आ रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande