
नांदेड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गंगाबेट नदीच्या गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या गोपनीय माहिती आधारे पोलिसांनी साठवलेली पाच ब्रास रेती, एक इंजिन, आठ तराफे जाळुन नष्ट केले.
या कारवाईत एकूण ७लाख २५ हजार रुपये मुद्देमाल जप्त करून तीन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गोण खनिज (रेती) उपसा व वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत सर्व पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोहेका अर्जुन मुंडे, पोका शेख समीर, पोकॉ. सिरमलवार, सर्व
नेमणूक पो.स्टे. नांदेड ग्रामीण अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली.
गोदावरी नदीपात्रात चोरून अवैध रेती उपसा होत असल्याची माहितीवरून योग्य तो सापळा लावला या कारवाईत गंगाबेट गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या इसमावर छापा टाकला .एक इंजीन व आठ तराफे जागीच नष्ट केले. उपसा करून किनाऱ्यावर साठवलेली ०५ ब्रास रेती जप्त केली आहे. आरोपी विरोधात कलम ३०३ (२), ३ (५) भा. न्या. सं. सहकलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ९.१५ पर्यावरण संरक्षण अधिनियम व कलम ३,७ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis