सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापे
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री, वाहतूक, हातभट्ट्यांवर छापेमारी सुरु केली आहे. २३ ते २६ डिसेंबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद
सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापे


सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री, वाहतूक, हातभट्ट्यांवर छापेमारी सुरु केली आहे. २३ ते २६ डिसेंबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, संजय चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकांनी ही कारवाई केली. या कारवाईत पथकांनी ४२ गुन्हे दाखल करीत ५० जणांवर कारवाई केली आहे.

यात २८ हजार २९० लिटर गुळमिश्रित रसायन, १४३४ लिटर हातभट्टी, १७५ लिटर देशी व १८ लिटर विदेशी दारु, ११ लिटर बिअर, ७५ लिटर ताडी जप्त केली आहे. ज्या नागरिकांना अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारु विक्री, वाहतुकीची माहिती असेल, त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्‌सॲपवर कळवावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande