
यहां के हम सिकंदर' ; दिव्यांग महोत्सवाचे थाटात उद्घाटन
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन समाजाने वाटचाल केल्यास आपला समाज पर्यायाने देशाचा विकास होईल. बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित ' यहां के हम सिकंदर' हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चा उपक्रम म्हणजे समाजासाठी मोठा आदर्श असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
शहरातील गंगा मंगल कार्यालयात आयोजित ' यहां के हम सिकंदर' दिव्यांग महोत्सवाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले.बालरंगभूमी परिषद मुंबई च्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परभणी शाखेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय करभाजन, डॉ.राजाराम झोडगे, बंडूनाना सराफ, लायन्स क्लबचे अरुण टाक, ॲड.रवी कातनेश्वरकर, अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, डॉ. अर्चना चिक्षे, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, उपेंद्र दुधगावकर, प्रमुख कार्यवाह त्र्यंबक वडसकर यांची उपस्थिती होती.
या महोत्सवात परभणी जिल्ह्यातील 16 दिव्यांग शाळांनी सहभाग नोंदवला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, चित्रकला उत्कृष्टपणे सादर केल्या. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व कलावंतांचे कौतुक केले.
दिव्यांगांना सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. नियतीने त्यांच्यावर अन्याय केला असला तरी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना योग्य संधी व प्रोत्साहन दिले तर निश्चितच त्यांच्यातून चांगले कलाकार निर्माण होतील. असे यावेळी सांगण्यात आले रवींद्र जैन, सुधा चंद्रन, अशोक थोरात, सोनाली नवांगुळअशा अनेक उत्तम दिव्यांग कलाकार, साहित्यिक यांनी त्या त्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis