
छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. भारतीय जनता पक्षाचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी निवडणूक तयारी, संघटनात्मक आढावा आणि पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासाला बळ देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने व्यवस्थापन समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत निवडणूक व्यवस्थापन, प्रचार नियोजन, संघटनात्मक समन्वय तसेच आगामी रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रभागनिहाय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यांच्या आयोजनासंदर्भातही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis