स्थानिक आमदार आणि भाजप शहराध्यक्ष हेच सर्व उमेदवार ठरवतील -पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)भाजपा हा पक्ष प्रचंड मजबूत पक्ष आहे. मोठ्या प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक आमदारांचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यामुळे घासा घाशी, नाराजी ही होणारच आहे. यामुळे चिंता नको. सर्व मिळून व्यवस्थित
स्थानिक आमदार आणि भाजप शहराध्यक्ष हेच सर्व उमेदवार ठरवतील -पालकमंत्री जयकुमार गोरे


सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)भाजपा हा पक्ष प्रचंड मजबूत पक्ष आहे. मोठ्या प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक आमदारांचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यामुळे घासा घाशी, नाराजी ही होणारच आहे. यामुळे चिंता नको. सर्व मिळून व्यवस्थित योग्य मार्ग काढू. महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात मी कधीही भाष्य केले नाही. स्थानिक आमदार आणि भाजप शहराध्यक्ष हेच सर्व उमेदवार ठरवतील. मी एकही उमेदवार सुचविला नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास ते ज्या पक्षात निवडणूक लढवतील तेथे त्यांचा प्रचार करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अखेर आज एका हॉटेलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री गोरे म्हणाले, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. समन्वयक या नात्याने माझ्यावर नाराजी व्यक्त होणे साहजिक आहे. सर्वांच्या समन्वयाने चर्चेअंती योग्य मार्ग निघेल. जागा वाटपावर मी कधीही भाष्य केले नाही. सोलापूर महापालिकेचे सर्व उमेदवार स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष ठरवतील माझा एकही उमेदवार मी सुचविला नाही. सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार आहे.

एकमेकांच्या मतदारसंघात जागांची मागणी करणे हा मुख्य कारण आहे, त्यावरही मार्ग निघेल. उमेदवारांच्या नावासंदर्भात ही चर्चा झाली. त्यातून सगळे मिळून निर्णय घेणार आहोत. भाजपा हा मजबूत पक्ष आहे. प्रत्येक आमदारांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यामुळे नाराजी उमटणे साहजिक आहे. भाजपची ताकद प्रचंड आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. आम्ही सर्व मिळून व्यवस्थित मार्ग काढणार आहोत, असे पालकमंत्री म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande