धामणगावात प. स. माजी सभापतीसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)। मागील पाच वर्षापासून धामणगाव विधानसभा मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामाच्या झंझावातामुळे धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, प च्या माजी सभापती, माजी सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष यांच्यास
धामणगावात काँग्रेसला खिंडार,जगतापांना झटका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, प. स. माजी सभापती सह  काँग्रेस कार्यकर्त्यांचा  भाजपात प्रवेश


अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)। मागील पाच वर्षापासून धामणगाव विधानसभा मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामाच्या झंझावातामुळे धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, प च्या माजी सभापती, माजी सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश घेतला. तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर प स सर्कलचे माजी सदस्य , धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काँग्रेसचे विद्यमान संचालक रवी भुतडा, प्रगती भुतडा (काळमेघ),,काँग्रेस च्या प स माजी सभापती शारदा पाटील, माळी समाज संघटनेचे दिलीप पाटील, वाढोणा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पंकज गायकवाड, देवगाव चे माजी उपसरपंच हेमंत मोरे ,माजी ग्रां प सदस्य उमेश दुर्गे ,मारोती सातपुते यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात नागपूर येथील आयोजित कार्यक्रमात भाजपात प्रवेश घेतला. आमदार प्रतापदादा अडसड यांच्याजवळ विकासाचे व्हिजन आहे त्यांनी पाच वर्षात धामणगाव विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली. त्यामुळे आपण भाजपात प्रवेश घेत असल्याचे काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी सांगितले . यावेळी भाजपा विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे, भाजपा अमरावती ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे , धामणगावच्या नगराध्यक्ष डॉ अर्चना रोठे अडसड, कृष्णा मारोडकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण खैरकार, प्रणय राजनकर सुनील साकोरे विठ्ठलराव राळेकर, मोहन इंगळे ,राजू केला, मनोज डहाके, मंगेश मारोडकर,विजय कांडलकर, मनोज धांदे, प्रमोद ढाले, पवन पडोळे यांच्यासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande