परभणी : ज्ञानोपासक' च्या 'रासेयो' चे वार्षिक शिबीर
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या येनोली येथे सुरू असलेल्या वार्षिक विशेष शिबिरात गोदावरीताई मुंडे यांच्या गायनाने शिबिरार्थ्यांना अक्षरश: भुरळ घातली. जिंतूर तालुक्यातील येनोली येथे
ज्ञानोपासक' च्या 'रासेयो' चे वार्षिक शिबीर


परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या येनोली येथे सुरू असलेल्या वार्षिक विशेष शिबिरात गोदावरीताई मुंडे यांच्या गायनाने शिबिरार्थ्यांना अक्षरश: भुरळ घातली. जिंतूर तालुक्यातील येनोली येथे ज्ञानोपासक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबीर होत आहे. या शिबिरात प्रख्यात गायिका गोदावरीताई मुंडे यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात गोदावरीताईंनी आपल्या मंजूळ आवाजात अभंग आणि गौळणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे गोदावरीताईंनी गायिलेल्या 'रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा', 'देव माझा मी देवाचा', 'धरीला पंढरीचा चोर', 'विठ्ठल माझा माझा माझा माझा माझा', 'ऐकुनी वेणुचा नाद' 'नंदलाला रे गोपाळा' इत्यादी रचनांनी शिबिरार्थ्यांना अक्षरश: डोलायला लावले. 'धरिला पंढरीचा चोर' ही रचना तर रसिकांनी फारच उचलून धरली. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीतही शिबिरार्थ्यांनी या अभंगावर ठेका धरला. हार्मोनियम व गायनाची साथ सौ. शिवनंदा पांचाळ यांनी दिली. पांचाळ यांनी 'दुडीवर दुडी गौळणी' ही रचना सुरेल आवाजात सदर केली. मृदंगाची साथ ईश्वर पांचाळ व बालाजी सानप यांनी दिली.

या कार्यक्रमास, शेवडी व अंबरवाडी येथील भजनी मंडळ, टाळकरी उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गोदावरीताई मुंडे व शिवनंदा पांचाळ, परमेश्वर घुले, शेवडी व अंबरवाडी येथील भजनी मंडळांचा अमरगड संस्थानचे मठाधिपती प.पू. ज्ञानेश्वर माऊली पवार व शांताबाई पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. निवृत्ती पोपतवार यांनी केले. कार्यक्रमास शिबिरार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande