
छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)। भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते
दुधड, ता.छत्रपती संभाजीनगर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक कामांची या माध्यमातून सुरुवात झाली.
लहुकी नदीवर संरक्षक भिंत व घाट बांधकाम (२ कोटी २५ लक्ष )
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम (२५ लक्ष)
आर.आर.आबा स्मार्ट ग्राम बक्षीस रकमेतून गट नं. १६८ पेव्हर ब्लॉक बसविणे (२५ लक्ष)
गट नं.१६८ मध्ये भूमिगत गटार (ड्रेनेज) लाईन बांधकाम (७.५० लक्ष)
तलाठी भवन इमारत बांधकाम (२० लक्ष )
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता (७ लक्ष)
तांडा वस्ती सुधार योजना स्ट्रीट लाईट बसविणे( ३ लक्ष )
ग्रामनिधीतून नव्या पुलावर सेप्टिक टँक बांधकाम (३ लक्ष)
चर्चसाठी संरक्षक भिंत बांधकाम (१५ लक्ष )
व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण (७ लक्ष)
याप्रसंगी श्री.दामू अण्णा नवपुते, श्री.सजन नाना मते, श्री.भाऊराव मामा मुळे, श्री.आप्पासाहेब शेळके, श्री.अशोक जिजा पवार, श्री.त्रिंबक सुलाने, सरपंच गंगासागरताई चौधरी, उपसरपंच श्री.बाळासाहेब बोरुडे, ग्रामस्थ व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis