
छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे बैठकांचे सत्र सुरू झाले असून सर्व पदाधिकारी आणि नेते एकत्र होत आहेत मात्र अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही.
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे नेते पदाधिकारी यांनी मंत्री एकमेकांच्या निवासस्थानी जाऊन बैठका घेत आहेत मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होण्याची शक्यता दाट दु आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महायुतीच्या बैठकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर विकास जैन, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहराध्यक्ष श्री. किशोर शितोळे, निवडणूक प्रमुख समीर राजुरकर, ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह महायुतीतील इतर अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis