दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी शुभमन आणि हार्दिकचे संघात पुनरागमन
नवी दिल्ली, 3 डिसेंबर (हिं.स.)९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झालेल्या शुभमन गिलचाही या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे, प
हार्दिक पांड्या


नवी दिल्ली, 3 डिसेंबर (हिं.स.)९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झालेल्या शुभमन गिलचाही या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे, पण, अटींसह. बीसीसीआयने म्हटले आहे की, गिलची उपलब्धता सीओईच्या फिटनेस अहवालावर अवलंबून असेल. याचा अर्थ गिल पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाल्यासच तो खेळू शकेल. दरम्यान, दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागणाऱ्या हार्दिक पांड्याने संघात पुनरागमन केले आहे. मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्याविरुद्ध नाबाद ७७ धावा करून आणि एक विकेट घेत हार्दिकने आपली तंदुरुस्ती आणि फॉर्म दाखवून दिला होता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. पहिला सामना कटकमध्ये खेळला जाईल, तर दुसरा सामना ११ डिसेंबर रोजी न्यू चंदीगडमध्ये खेळला जाईल. मालिकेतील उर्वरित तीन सामने अनुक्रमे १४, १७ आणि १९ डिसेंबर रोजी धर्मशाळा, लखनऊ आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून तयारीला वेग देण्याचे लक्ष्य ठेवेल. संघात यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघेही आहेत.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-२० मालिकेत परतला आहे. तो यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता. त्याच्या कामाच्या ताणामुळे त्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. आता, तो मैदानात परतण्यास सज्ज आहे. दरम्यान, निवडकर्त्यांनी बुमराहसोबत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना जलद गोलंदाजी विभागात समाविष्ट केले आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे.

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (फिट असल्यास), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सनड

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande