मला प्रत्येक युद्धासाठी नोबेल मिळायला हवा - डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन , 3 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष थांबवण्यात आपली भूमिका असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख कर
मला प्रत्येक युद्धासाठी नोबेल मिळायला हवा- डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन , 3 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष थांबवण्यात आपली भूमिका असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले की त्यांनी संपवून दाखवलेल्या आठही युद्धांसाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा.

रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, “आम्ही आठ युद्ध संपवली… पण अजून एक शिल्लक आहे, तेही संपेल अशी मला आशा आहे.” पुढे ते म्हणाले, “प्रत्येक वेळी मी एखादं युद्ध संपवतो, तेव्हा लोक म्हणतात की जर ट्रम्पने हे युद्ध संपवलं तर त्यांना नोबेल पुरस्कार मिळेल. मी ते युद्ध संपवतो, तर म्हणतात—यासाठी नाही, पुढच्या युद्धासाठी मिळेल. आता म्हणतात की जर रशिया-युक्रेन युद्ध संपलं, तर नोबेल मिळेल. मग बाकी आठ युद्धांचं काय? भारत-पाकिस्तान—विचार करा किती युद्धं मी संपवली. मला प्रत्येक युद्धासाठी नोबेल मिळायला हवा, पण मी लालची बनू इच्छित नाही.”

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हेही स्पष्ट केलं की त्यांचा उद्देश पुरस्कार मिळवणे नसून लोकांचे प्राण वाचवणे हा आहे. ट्रम्प यांनी हा दावा देखील केला की 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या, व्हेनेझुएलाच्या कार्यकर्त्या मारिया कोरीना माचाडो पेरिस्का यांनीही म्हटलं आहे की ट्रम्प यांना हा सन्मान मिळायला हवा.

दरम्यान, 10 मे नंतर ट्रम्प यांनी 60 हून अधिक वेळा हा दावा पुनरुच्चार करत आहेत की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील “पूर्ण आणि तात्काळ” युद्धविराम त्यांच्या मध्यस्थीमुळे शक्य झाला. त्यादिवशी त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की वॉशिंग्टनमधील चर्चेनंतर दोन्ही देशांनी सहमती केली आहे. मात्र, नवी दिल्लीने सतत कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला नकार दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande