ट्रम्प यांचे जावई आणि राजदूत रशिया-युक्रेन करार करण्यात अयशस्वी
मॉस्को, 3 डिसेंबर (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा निराशा आली आहे. ट्रम्प यांनी शांतता प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आपले दूत रशियात पाठवले होते.
ट्रम्प यांचे जावई आणि राजदूत रशिया-युक्रेन करार करण्यात अयशस्वी


मॉस्को, 3 डिसेंबर (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा निराशा आली आहे. ट्रम्प यांनी शांतता प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आपले दूत रशियात पाठवले होते. मात्र युक्रेनच्या भूभागाविषयी दोन्ही देशांमध्ये सहमती न झाल्याने बैठकीनंतरही कोणताही निष्कर्ष निघाला नाही.

रशियाच्या क्रेमलिनमध्ये युक्रेन संघर्षावर शांतता बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन दूत— स्टीव विटकॉफ आणि त्यांचे जावई जेरेड कुशनर यांना पाठवले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ट्रम्प यांच्या दूतांमध्ये सुमारे पाच तासांची बैठक झाली. तरीसुद्धा, युद्ध समाप्तीसाठी संभाव्य शांतता करार घडवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.

क्रेमलिनचे अधिकारी युरी उशाकोव यांनी सांगितले की पुतिन यांनी ट्रम्प यांचे खास दूत विटकॉफ आणि कुशनर यांची उशिरा रात्री भेट घेतली. “दोन्ही पक्षांनी अमेरिकेच्या प्रस्तावांची व्यापक रूपरेखा पाहिली, परंतु कोणताही ठोस करार झाला नाही.”मीडिया रिपोर्टनुसार, उशाकोव यांनी सांगितले, “ट्रम्पच्या दूतांमध्ये आणि पुतिन यांच्यातील चर्चा अत्यंत उपयुक्त, रचनात्मक आणि ठोस होती. बैठक पाच मिनिटांची नव्हे, तर पाच तास चालली.” परंतु या संभाषणातून कोणताही निष्कर्ष निघाला नाही.

बैठकीत पुतिन यांनी अमेरिकेकडून पाठवण्यात आलेल्या चार प्रस्तावांवर चर्चा केली. काही मुद्द्यांवर ते सहमत झाले आणि आपल्या वाटाघाटी पथकाला याची पुष्टी दिली. पण काही प्रस्तावांवर टीका करण्यात आली.पुतिन यांनी ट्रम्प यांना अनेक महत्वाचे संदेश दिले आणि वैयक्तिक शुभेच्छाही दिल्या. मात्र दोन्ही देशांनी माध्यमांसमोर बैठकविषयी सविस्तर माहिती न देण्याचे ठरवले.

उशाकोव यांनी पुष्टी केली की चर्चेत “क्षेत्रीय समस्या” या विषयावरही चर्चा झाली—हा तो शब्द आहे जो क्रेमलिन डोनबासच्या संपूर्ण प्रदेशावर रशियाचे दावे सिद्ध करण्यासाठी वापरते. तथापि, युक्रेन अजूनही सुमारे 5,000 चौ.किमी भूभागावर नियंत्रण ठेवून आहे, ज्यावर रशिया दावा करतो. आणि जवळजवळ सर्व देश डोनबासला युक्रेनचा भाग मानतात.शेवटी उशाकोव म्हणाले, “वॉशिंग्टन आणि मॉस्को दोन्हीकडे अजून खूप काम करणे बाकी आहे. यावरच दोन्ही बाजूंनी सहमती झाली आहे, आणि संपर्क पुढेही सुरू राहतील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande